'Hath Laga Ke Toh Dikha!' दिल्ली मेट्रोतील दोन महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडिओ

दिल्ली मेट्रोतील दोन महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक महिला चक्क दुसऱ्या महिलेला हातात स्फ्रे घेऊन धमकी देताना दिसत आहे. दोन महिलांमधील भांडणाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, माझ्या अंगाला हात तर लावून दाखव, असे म्हणत एक महिला दुसऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारताना दिसते.

Delhi Metro

दिल्ली मेट्रोतील दोन महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक महिला चक्क दुसऱ्या महिलेला हातात स्फ्रे घेऊन धमकी देताना दिसत आहे. दोन महिलांमधील भांडणाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, माझ्या अंगाला हात तर लावून दाखव, असे म्हणत एक महिला दुसऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारताना दिसते. ज्यामुळे सहप्रवाशांनाही त्रास होताना दिसतो आहे. महिलेने स्प्रे फवारल्यानंतर मेट्रो डब्यामध्ये प्रवासी शिंकताना आणि खोकताना आढळून येतात.

दोन महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसते की, महिला एकमेकांवर शारिरीक व शाब्दिक वार करत आहेत. त्यांनी एकमेकींना शिवीगाळ केली. जी मेट्रोच्या परिसरात अपेक्षित नाही. दिल्ली मेट्रोच्या डब्यात सीटवरून दोन प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाला, व्हिडिओ व्हायरल झाला.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now