Half-Day Holiday For Banks: अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 22 जानेवारी रोजी बँका दुपारी 2:30 वाजेपर्यंत राहणार बंद
बँका अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद राहणार आहेत. अर्थमंत्रालयाने याबाबत परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे.
Half-Day Holiday For Banks: केंद्र सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने 22 जानेवारी 2024 रोजी, दुपारी 2:30 वाजेपर्यंत देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापने अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका/सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या/सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था आणि प्रादेशिक ग्रामीण बँका अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद राहणार आहेत. अर्थमंत्रालयाने याबाबत परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे. (हेही वाचा: High-Level Cyber Team In Ayodhya: राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी उच्चस्तरीय सायबर तज्ञ टीम अयोद्धेत तैनात)