Gujarat: वडोदरा जिल्ह्यातील नंदेसरी येथील कंपनीमध्ये स्फोटानंतर भीषण आग; 15 जण जखमी (Watch Video)

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट बॉयलरमध्ये झाला. यानंतर आग संपूर्ण प्लांटमध्ये पसरली

Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील नंदेसरी भागातील दीपक नायट्रेट नावाच्या कंपनीत आज दुपारी झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच वडोदरा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या अपघातामध्ये 15 जण जखमी झाले असून अद्याप मृतांचा आकडा कळू शकलेला नाही. आगीमुळे संपूर्ण महामार्ग बंद करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट बॉयलरमध्ये झाला. यानंतर आग संपूर्ण प्लांटमध्ये पसरली आणि आगीमुळे इतर दोन बॉयलरही फुटले. एकापाठोपाठ आठ स्फोटांचे आवाज ऐकू आले. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या स्फोटांचे आवाज 10 ते 15 किलोमीटर पर्यंत ऐकू आले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now