Gujarat Boat Accident: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना; तलावात बोट उलटून 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु (Watch Video)

या घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई आणि अपघातातील जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Gujarat Boat Accident: गुजरातमधील वडोदरा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. अहवालानुसार, या ठिकाणी हर्णी मोटनाथ तलावात बोट उलटून तब्बल 16 मुलांचा मृत्यू झाला आहे. बोटीवर एकूण 31 लोक होते, ज्यात न्यू सनराईज स्कूलचे 23 विद्यार्थी, चार शिक्षक आणि बोट ऑपरेटरसह चार जण होते. या अपघातामध्ये बचावलेल्या सर्वांना एसएसजी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रिपोर्ट्सनुसार, न्यू सनराईज स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि इतर स्टाफ हर्णी तलावाला भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी 16 जणांची क्षमता असलेल्या बोटीमध्ये जवळजवळ 31 लोकांना बसवण्यात आले. त्यानंतर काही वेळातच बोट तलावात उलटली. बोट तलावात पडताच आरडाओरडा झाला व त्यावेळी तलावाजवळ असलेल्या लोकांनी तत्काळ हर्णी तलाव व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर बचावकार्य सुरु झाले. या घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई आणि अपघातातील जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. (हेही वाचा: Sudden Death in Madhya Pradesh: इंदूरमध्ये कोचिंग क्लासमध्ये शिकत असताना विद्यार्थ्याला आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू)