Gujarat ATS Arrests Four ISIS Terrorists: गुजरात एटीएसला मोठे यश; 4 दहशतवाद्यांना अटक, सर्व श्रीलंकेचे नागरिक, तपास सुरु

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी कोणत्या उद्देशाने पोहोचले, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी पोलिसांनी पोरबंदरमधून ISIS साठी काम करणाऱ्या काही संशयितांना अटक केली होती.

Gujarat ATS Arrests Four ISIS Terrorists: गुजरात एटीएसला मोठे यश; 4 दहशतवाद्यांना अटक, सर्व श्रीलंकेचे नागरिक, तपास सुरु
ISIS Terrorists

Gujarat ATS Arrests Four ISIS Terrorists: गुजरात पोलिसांनी इस्लामिक स्टेटच्या चार दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण श्रीलंकेतील रहिवासी आहेत. हे सर्वजण इस्लामिक स्टेटशी संबंधित आहेत. गुजरात पोलिसांच्या एटीएसने दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एटीएस या सर्व दहशतवाद्यांना गुप्त ठिकाणी नेऊन त्यांची चौकशी करण्यात व्यस्त आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी कोणत्या उद्देशाने पोहोचले, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी पोलिसांनी पोरबंदरमधून ISIS साठी काम करणाऱ्या काही संशयितांना अटक केली होती. गुजरात पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी श्रीलंकेतून पाठवण्यात आले होते. ते श्रीलंकेहून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अहमदाबाद येथून लक्ष्यित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्याला गुजरात एटीएसने अटक केली. (हेही वाचा: Uttar Pradesh Crime: गाझियाबादमध्ये घरात घुसून गोळीबार, घटना CCTV कैद, गुन्हा दाखल)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2024 03:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).