Guidelines for International Arrivals: सरकारने जारी केल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सुचना; सादर करावा लागेल 14 दिवसांच्या प्रवासाचा तपशील

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 1 डिसेंबरपासून भारतामध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे.

Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: Getty Images)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 1 डिसेंबरपासून भारतामध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. आता प्रवासाच्या आधी निगेटिव्ह RT-PCR अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे आणि प्रवासापूर्वी 14 दिवसांच्या प्रवासाचा तपशील सादर करावा लागेल. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रिस्क असलेल्या देशांमधून प्रवाशांच्या आगमनानंतर त्यांची भारतीय विमानतळावर कोविड चाचणी होईल आणि विमानतळावरच निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना

7 दिवस होम क्वारंटाईन केले जाईल. 8 व्या दिवशी पुन्हा चाचणी होईल. 'जोखीम असलेल्या' देशांव्यतिरिक्त इतर देशांतील प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल मात्र त्यांना 14 दिवसांसाठी स्वत: ची काळजी घ्यावी लागेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement