Govt Advises To Use Mask: कोविड 19 चा धोका अद्यापही टळलेला नाही, वयोवृद्ध, सहव्याधी असणार्यांना घरात, घराबाहेर Mask वापरण्याचा सल्ला
भारतामध्ये अद्याप कोविड 19 कोरोना रूग्णसंख्या चिंताजनक स्थितीत नाही पण जगात काही ठिकाणी वाढणारी रूग्णसंख्या पाहता आता खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
भारताचा शेजारी चीन मधील वाढती कोरोनारूग्णसंख्या आता सार्यांची चिंता पुन्हा वाढवत आहे. यामध्ये आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी बैठक घेऊन प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या आणि योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान नीती आयोगाचे सदस्य Dr VK Paul यांनी मीडीयाशी बोलताना अद्याप प्रवासावर बंधनचा विचार नाही पण खबरदारीचा उपाय म्हणून वयोवृद्ध, सहव्याधी असणार्यांना घरात, घराबाहेर Mask वापरण्याचा सल्ला दिला आहे. नक्की वाचा: Rise In COVID 19 Cases: चीन मध्ये वाढती कोरोनारूग्णसंख्या चिंताजनक पण भारताला घाबरायला गरज नाही - Adar Poonawalla .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)