Ghaziabad Horror: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये पेट्रोल पंपावर व्यक्तीने प्रेयसीला केली बेदम मारहाण, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)

लोक त्याच्याजवळ उभे राहून हा तमाशा पाहत राहिले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोघे भांडताना दिसत आहेत. तरुण आपल्या प्रेयसीला जमिनीवर ढकलतो व तिला मारहाण करतो.

Man Brutally Assaults Girlfriend at Petrol Pump in Uttar Pradesh (Photo Credits: X/@lokeshRlive)

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील प्रियकर-प्रेयसीमधील भांडणाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. गाझियाबादच्या साहिबााबाद भागातील एका पेट्रोल पंपावर एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केला, तिला मारहाण केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यादरम्यान आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांपैकी कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. लोक त्याच्याजवळ उभे राहून हा तमाशा पाहत राहिले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दोघे भांडताना दिसत आहेत. तरुण आपल्या प्रेयसीला जमिनीवर ढकलतो व तिला मारहाण करतो.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी साहिबााबादचे एसीपी रजनीश उपाध्याय म्हणाले, ‘आम्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.’ माहितीनुसार, आरोपी आणि त्याची महिला मैत्रिण बऱ्याच दिवसांपासून एकत्र राहत होते. आता या घटनेमुळे त्यांच्यातील नात्यातील तणाव उघड झाला आहे. या घटनेच्या व्हिडिओच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ पाहून स्थानिक लोकांनीही तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. महिलेशी होणारे हे वर्तन निंदनीय असून पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई करावी, असे लोकांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Old Man Molest Minor in Gujarat: गुजरातमधील राजकोटमध्ये 4 वर्षांच्या मुलीचा विनयभंग; व्हिडीओ समोर येताच 92 वर्षीय वृद्धाला अटक

व्यक्तीने प्रेयसीला केली बेदम मारहाण-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now