Jail Pixabay

Old Man Molest Minor in Gujarat: गुजरातमधील राजकोटमध्ये एका 92 वर्षीय व्यक्तीने 4 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी वृद्धाला अटक करून न्यायालयात हजर केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटमधील रेल नगर भागातील एका सोसायटीत गुरुवारी चार वर्षांची मुलगी घराजवळ खेळत होती. त्यावेळी ही घटना घडली.

शेजारी राहणाऱ्या 92 वर्षीय नवलशंकर देसाई याने चार वर्षांच्या पीडित मुलीचा विनयभंग केला.

पोलिसात दिलेल्या तक्रारीत मुलीच्या आईने म्हटले आहे की, मी गुरुवारी घराबाहेर बसले होते. (Bomb Threat to Flights: ईमेलवर धमकीचे संदेश पोस्ट केल्याबद्दल दिल्लीतील एकाला अटक, 'लक्ष वेधण्यासाठी' कृत्य केल्याचा खुलासा (Watch Video))

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

पोलिसात दिलेल्या तक्रारीत मुलीच्या आईने म्हटले की, मुलगी शेजारच्या घराजवळ खेळत होती. थोड्यावेळाने ती घरी आली म्हणाली कि आजोबांनी मला चुकीचा स्पर्श केला. यामुळे ती घाबरली आणि मी माझ्याडे आली. त्यानंतर सोसायटीत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीतून समोर आली.

सीसीटीव्हीमध्ये 92 वर्षीय व्यक्ती मुलीची छेड काढत असल्याचे स्पष्ट दिसत होते. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यांना तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी झोन-2 चे डीसीपी जगदीश बनगरवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला लवकरच शिक्षा व्हावी यासाठी आम्ही आरोपपत्र दाखल करू. सर्व परिस्थितीजन्य पुरावेही गोळा केले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी कलम 164 अन्वये न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडित मुलीचा जबाबही नोंदवला.