Gangster Jarnail Singh Shot Dead: पंजाबमध्ये गँगस्टर जरनैल सिंगची हत्या; चार जणांनी दिवसाढवळ्या केला अंदाधुंद गोळीबार (Watch Video)

हे हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आले होते. जरनैल सिंगची हत्या करून चारही हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

Gangster Jarnail Singh Shot Dead: पंजाबमध्ये गँगस्टर जरनैल सिंगची हत्या; चार जणांनी दिवसाढवळ्या केला अंदाधुंद गोळीबार (Watch Video)

पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात गँगस्टर जरनैल सिंगची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अमृतसरच्या सथियाला गावात गोपी घनशाम पुरिया गटाच्या टोळीतील सदस्यांनी जरनैल सिंगवर गोळीबार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. हे हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आले होते. जरनैल सिंगची हत्या करून चारही हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी जरनैल सिंह हा त्याच्या गावी घरी होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. चार मुखवटा घातलेले हल्लेखोर येतात आणि जरनैल सिंग याच्यावर अंदाधुंद गोळीबार करतात, असे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. (हेही वाचा:  सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर वर्गमित्रासह शाळेतील मुलांनी केला बलात्कार; गुन्हा दाखल, आरोपींना अटक)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2023 06:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).