Zomato ने पोहोचवली नाही खाद्यपदार्थांच्या ऑर्डर; ग्राहक न्यायालयाने दिले 8,362 रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश

तक्रारदाराच्या मानसिक त्रासाची भरपाई म्हणून 5,000 रुपये आणि 3,000 रुपये कार्यवाहीची किंमत, अशी एकूण 8,362 रुपये तक्रारदाराला मिळावेत असा आदेश देण्यात आला.

Zomato Logo (Photo Credits: Facebook)

कोल्लम येथील जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने, ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोला एका विद्यार्थ्याला 8,362 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या विद्यार्थ्याने 362 रुपये किमतीचे अन्न ऑर्डर केले होते, परंतु हे अन्न वितरित केले नाही आणि या अन्नाची रक्कमही परत केली गेली नाही. अध्यक्ष ईएम मोहम्मद इब्राहिम, सदस्य एस संध्या राणी आणि स्टॅनली हॅरॉल्ड यांना आढळले की, ग्राहक 362 रुपये व्याजासह परतावा मिळण्यास पात्र आहे. याव्यतिरिक्त, तक्रारदाराच्या मानसिक त्रासाची भरपाई म्हणून 5,000 रुपये आणि 3,000 रुपये कार्यवाहीची किंमत, अशी एकूण 8,362 रुपये तक्रारदाराला मिळावेत असा आदेश देण्यात आला.

अरुण जी कृष्णन असे तक्रारदाराचे नाव असून तो, दिल्ली विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेतील कायद्याच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने तिरुअनंतपुरममध्ये झोमॅटोद्वारे दोन ऑर्डर दिल्या होत्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now