karnatakata: वर्षानुवर्षे मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी स्वयंभू बाबा आणि त्याच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल
त्यानंतर त्याने महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला.
कर्नाटकातील एका महिलेचे वर्षानुवर्षे लैंगिक शोषण केल्याबद्दल गॉडमन आणि या कृत्यामध्ये पतीला मदत केल्याने या गॉडमनच्या पत्नीवर मंगळवारी एफआयआर दाखल करण्यात आला. अवलहल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंदमूर्ती पाच वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात पीडितेला भेटला होता, जिथे त्याने तिला सांगितले होते की भविष्यात तिच्या आणि तिच्या कुटुंबाचे काहीतरी वाईट होईल. नंतर त्याने सांगितले की पूजा करून या गोष्टी टाळला येऊ शकतील व या पूजेसाठी त्याने महिलेला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्याने महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. आरोपीची पत्नी लता हिने या घृणास्पद कृत्याचा व्हिडीओ बनवला व ही घटना कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)