घटस्फोटानंतर आईसोबत राहत असलेल्या मुलींना सांभाळण्यासाठी, उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी वडील कायदेशीररित्या बांधील; Karnataka High Court चा महत्वाचा निर्णय
कर्नाटक उच्च न्यायालयाने अधोरेखित केले की, वडील मुलींचे पालनपोषण करण्यास कायदेशीररित्या बांधील आहेत आणि मुली त्यांच्यापासून वेगळ्या (माजी पत्नीसोबत) राहत असल्या तरी वडिलांनी मुलींना उत्कृष्ट शिक्षण प्रदान करणे गरजेचे आहे.
जोडप्याच्या घटस्फोटानंतर मुली आईसोबत राहत असल्या तरी, त्यांना सांभाळण्यासाठी, उत्कृष्ट शिक्षण प्रदान करण्यासाठी वडील कायदेशीररित्या बांधील आहेत, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. आपल्या मुलींना सांभाळण्याच्या आदेशाला आव्हान देणारी एका पुरुषाची याचिका फेटाळताना कर्नाटक उच्च न्यायालयाने अधोरेखित केले की, वडील मुलींचे पालनपोषण करण्यास कायदेशीररित्या बांधील आहेत आणि मुली त्यांच्यापासून वेगळ्या (माजी पत्नीसोबत) राहत असल्या तरी वडिलांनी मुलींना उत्कृष्ट शिक्षण प्रदान करणे गरजेचे आहे. अशोक एस किनगी यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने ट्रायल कोर्टाने जारी केलेल्या आदेशाला आव्हान देणारी, बी सी हनुमंतराजू यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. ट्रायल कोर्टाने या वडिलांना त्यांच्या मुलींचे लग्न लग्न होईपर्यंत त्यांना दरमहा 6,000 रुपये देण्याचे निर्देश दिले होते. तसेच चालू शैक्षणिक वर्षात झालेल्या शैक्षणिक खर्चापोटी 1,04,000 रुपये देण्याचेही निर्देश दिले होते. या निर्णयाला वडिलांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (हेही वाचा: Dowry Death Case: हुंड्याच्या हव्यासापोटी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीसह नातेवाईकांना जन्मठेपेची शिक्षा; उत्तर प्रदेशमधील घटना)
Father Legally Bound to Maintain Daughters, Says HC-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)