Family Tries To Kidnap Bride: लग्नामध्ये चक्क वधूच्या अपहरणाचा प्रयत्न; वराच्या कुटुंबावर मिरचीपूडचा हल्ला (Video)

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. मुलगी ओरडत राहिली पण चुलत भावांना तिची दया आली नाही. याप्रकरणी वराच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला आहे.

Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Family Tries To Kidnap Bride: आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात एका लग्नामध्ये एका विचित्र घटना समोर आली आहे. ठिकाणी वधूला तिच्या कुटुंबीयांकडून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी घडलेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. एवढेच नाही तर वधूच्या कुटुंबीयांकडून वराच्या कुटुंबीयांवर मिरची पावडरने हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. मुलगी ओरडत राहिली पण चुलत भावांना तिची दया आली नाही. याप्रकरणी वराच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 21 एप्रिलची आहे.

अहवालानुसार, वधूच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे तिने पळून जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केले. 13 एप्रिल रोजी मुलीने घर सोडले आणि मंदिरात मुलाशी लग्न केले. मुलीच्या कुटुंबाला ही गोष्ट पटली नाही. त्यानंतर 21 तारखेला वराच्या कुटुंबाने औपचारिक लग्नाचे आयोजन केले होते, ज्यात मोठ्या संख्येने पाहुणे उपस्थित होते. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी पाहुण्यांवर मिरची पावडरने हल्ला केला आणि त्यांच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा: Old Man Sets His Elderly Relative On Fire: तामिळनाडूतील कृष्णगिरीमध्ये जमिनीवरून वाद; 26 वर्षीय व्यक्तीने वृद्ध नातेवाईकाला दिलं पेटवून)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now