Old Man Sets His Elderly Relative On Fire: तामिळनाडूतील कृष्णगिरीमध्ये जमिनीवरून वाद; 26 वर्षीय व्यक्तीने वृद्ध नातेवाईकाला दिलं पेटवून (Watch Video)
Old Man Sets His Elderly Relative On Fire (PC - X/@Autokabeer)

Old Man Sets His Elderly Relative On Fire: तामिळनाडू (Tamil Nadu) च्या कृष्णगिरी जिल्ह्यात जमिनीच्या वादातून 55 वर्षीय व्यक्तीला त्याच्या 26 वर्षीय नातेवाईकाने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वृत्तानुसार, ही घटना 21 एप्रिल रोजी घडली. व्ही. चिन्नावर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर (Viral Video) समोर आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिन्नावर यांचा 26 वर्षीय नातेवाईक एम. सेंथिल याच्यासोबत जमिनीचा वाद होता. 19 एप्रिल रोजी दोघांच्या कुटुंबात भांडण झाले, त्यानंतर रविवारी 21 एप्रिल रोजी सेंथिलने चिन्नावर यांच्या घरी जाऊन त्याला पेटवून दिले.

या दुःखद घटनेनंतर लगेचच, शेजाऱ्यांनी आग विझवली आणि चिन्नावरला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जेथे डॉक्टरांनी पीडित 70% भाजले असल्याचे सांगितले. या प्रकरणी कावेरीपट्टणम पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते आरोपीचा शोध घेत आहेत. (हेही वाचा - PTI Teacher Slapping Woman Principal: इलेक्शन ड्युटी लावण्याने संतापलेल्या पीटीआय शिक्षकाने महिला मुख्याध्यापिकेला लगावली कानशीलात, पहा व्हायरल व्हिडिओ)

पहा व्हिडिओ - 

दरम्यान, केरळमधून बर्ड फ्लूचे अधिक रुग्ण आढळल्यानंतर तामिळनाडू सरकारने सीमावर्ती भागात सतर्कता वाढवली आहे. रविवारी, अलप्पुझा जिल्ह्यातील आणखी काही ठिकाणांहून H1N1 विषाणूची पुष्टी झाल्यानंतर सुमारे 25,000 बदकांना मारण्यात आले. शुक्रवारी केरळमध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर तामिळनाडू सरकारने कोईम्बतूरमध्ये केरळच्या सीमेला लागून असलेल्या भागात तपासणी अधिक कडक केली आहे.