Employment Generated During 2014-24: मोदी सरकारच्या कार्यकाळात 51.4 कोटी लोकांना मिळाला रोजगार; SKOCH च्या अहवालात समोर आली माहिती

स्कॉच ग्रुपने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 2014-24 या वर्षात एकूण 51.40 कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यापैकी 19.79 कोटी नोकऱ्या सरकारच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झाल्या आहेत. उरलेल्या 31.61 कोटी रोजगारांमध्ये क्रेडिट-आधारित हस्तक्षेपांनी योगदान दिले आहे.

(Photo credit: archived, edited, representative image)

Employment Generated During 2014-24: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 51.40 कोटी रोजगार निर्माण झाल्याचा दावा देशांतर्गत संशोधन संस्था स्कॉचच्या (SKOCH) अहवालात करण्यात आला आहे. 'एम्प्लॉयमेंट क्रिएशन इम्पॅक्ट ऑफ मोडिनॉमिक्स: अ चेंज इन पॅराडाइम' शीर्षक असलेला हा अहवाल 80 केस स्टडीवर आधारित आहे. स्कॉच ग्रुपने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 2014-24 या वर्षात एकूण 51.40 कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. यापैकी 19.79 कोटी नोकऱ्या सरकारच्या हस्तक्षेपामुळे निर्माण झाल्या आहेत. उरलेल्या 31.61 कोटी रोजगारांमध्ये क्रेडिट-आधारित हस्तक्षेपांनी योगदान दिले आहे. यामध्ये विविध सरकारी योजना आणि कर्ज घेतलेल्या लोकांचा डेटा समाविष्ट आहे. स्कॉच ग्रुपचे अध्यक्ष आणि अहवालाचे लेखक समीर कोचर म्हणाले की, 2014 पासून सुरू झालेल्या अनेक सरकारी योजनांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाल्याचे सिद्ध होते. (हेही वाचा: Indeed Layoffs: अमेरिकन जॉब सर्च फर्म इनडीड आपल्या 1000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; सीईओ Chris Hyams यांनी प्रभावित लोकांना दिल्या चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now