Fali S Nariman Passes Away: ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरीमन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन

Fali S Nariman राज्यसभेचे माजी खासदार होते तसेच भारत सरकारने त्यांचा गौरव पद्मभूषण, पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने केला आहे.

फली एस नरीमन

ज्येष्ठ विधिज्ञ Fali S Nariman यांचं आज (21 फेब्रुवारी) वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाल आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिलीला सुरूवात केली होती. 1972 पासून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. मे 1972 मध्ये दिल्लीला गेल्यानंतर त्यांची भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली तेव्हा त्याचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत खासगी वकिली सुरू केली होती.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement