Telangana Stadium Collapse Video: तेलंगणात बांधकामाधीन स्टेडियम कोसळले, 2 जणांचा मृत्यू, 10 जखमी, बचावकार्य सुरू

अपघातानंतर ढिगाऱ्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखालून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील मोईनाबाद येथे एक बांधकाम सुरू असलेले खाजगी इनडोअर स्टेडियम कोसळले आहे. ज्यामध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात 10 जण जखमी झाले आहेत. ज्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे लोकांवर उपचार सुरु आहेत. अपघाताबाबत माहिती देताना राजेंद्रनगरचे डीसीपी जगदीश्‍वर रेड्डी म्हणाले, "बांधकाम सुरू असलेले खाजगी इनडोअर स्टेडियम कोसळल्याने दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 10 जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर ढिगाऱ्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. बचावकार्य सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखालून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. (हेही वाचा - Skill Development Scam Case: TDPचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना दिलासा, आंध्र प्रदेशातील उच्च न्यायालयातून जामिन मंजूर)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)