DY Patil Dies: माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.

त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल तसेच नामांकित शिक्षणसम्राट पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूर येथे निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते वयोमानानुसार आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील हे त्यांचे सुपुत्र आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement