KSRTC कडून महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंगळूरू मधून शिर्डी, मुंबई, पुणे कडे जाणार्या बससेवा रद्द
सध्या जाळपोळीनंतर पुणे-बेंगलूरू मार्गावरील वाहतूक अंशतः पुन्हा सुरू करण्यात यश आलं आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाकडून आंदोलन प्रखर करण्यात आले आहे. सरसकट आरक्षणाची मागणी करत असलेला मराठा समाज आता रस्त्यावर उतरून जाळपोळ करत आहे. आज पुणे-बेंगलूरू मार्ग रोखल्यानंतर KSRTC कडून बंगळूरू मधून शिर्डी, मुंबई, पुणे कडे जाणार्या बससेवा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या जाळपोळीनंतर पुणे-बेंगलूरू मार्गावरील वाहतूक अंशतः पुन्हा सुरू करण्यात यश आलं आहे. Maratha Reservation Protest: नवले ब्रीजवर आंदोलनकर्ते आक्रमक,घोषणाबाजी करत महामार्ग रोखला .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)