Jaipur: दारूच्या नशेतही रिल्सचे वेड सुटेना; एसयूव्ही थेट रेल्वे ट्रॅकवर आणली, दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव (Watch Video)
घटनास्थळी स्थानिक आणि पोलीस जमलेले दिसत आहेत.
Jaipur: राजस्थानमधील एका विचित्र घटनेत रेल्वे ट्रॅकवर एक एसयूव्ही अडकल्याचे दिसत(Vehicle Stuck on Railway Track) आहे. सुदैवाने यात कार चालकाचा जीव वाचला. समोरून येणाऱ्या मालगाडीच्या मोटरमनने वेळीच ब्रेक लावल्याने दुर्घटना टळली. मात्र, क्षुल्लक रील बनवण्यासाठी कार चालकाने थार कार थेट रेल्वे ट्रेक आणली (Drunk Man Drives Car)होती. राजस्थानच्या जयपूरमधली हा व्हिडीओ आहे. ज्यात कार चालक दारूच्या नशेत होता. रील बनवण्यासाठी त्याने कार रेल्वे ट्रेकवर आणली होती. मात्र, वेळीस उपस्थित लोकांनी, पोलिसांनी, या घटनेकडे लक्ष दिल्याने दुर्घटना झाली नाही. व्हिडीओत थार चालक रेव्ले ट्रेकवरून कार उतरवल्यानंतर कार वेगाने पळवताना देखील दिसत आहे. या घटनेनंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा: Viral Video: मद्यपीच्या अंगावर पडली उकळत्या गरम दुधाची कढई, व्हिडीओ व्हायरल)
एसयूव्ही थेट रेल्वे ट्रॅकवर आणली
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)