Drunk Girls Viral Video: दारुच्या नशेत टल्ली तरुणींची पोलिसांना शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले.

सहारनपूर रेल्वे रोडवरील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीसाठी आलेल्या तरुणींनी पोलिसांना दारुच्या नशेत शिवीगाळ केली आणि रस्त्यावर गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी मुलींना ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि नंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन तरुणी रेल्वे रोडवरील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या वेळी पोलिसांना पहताच तरुणी संतप्त झाल्या आणि त्यांनी रस्त्यावरच हुल्लडबाजी सुरू केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही तरुणी दारूच्या नशेत होत्या आणि त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करून गोंधळ घातला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)