Double Toll Tax: जाणून घ्या FASTag संदर्भात नवा नियम, नाहीतर खिशाला बसेल फटका; आकाराला जाईल दुप्पट टोल, NHAI ने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे

गाडीच्या समोरच्या विंडशील्डवर फास्टॅग चिकटवलेले नसल्यास दुप्पट वापरकर्ता शुल्क वसूल करण्यासाठी, एनएचएआयने सर्व वापरकर्ता शुल्क संकलन संस्थांना मानक कार्यप्रणाली (SoP) जारी केली आहे.

Toll | Image used for representational purpose only. | Image Courtesy: Wikimedia Commons

Double Toll Tax: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने फास्टॅग संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. फास्टॅग खिशात ठेवणे किंवा गाडीच्याब इतर कोणत्याही भागावर चिकटवल्यास कारवाई केली जाईल. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विंडशील्डवर व्यवस्थितपणे फास्टॅग फास्टॅग लावले नसल्यास, तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. फास्टॅग विंडशील्डव्यतिरिक्त इतर कुठेही चिकटवल्याने स्कॅनिंगमध्ये समस्या निर्माण होतात. यामुळे अनेक वेळा इतर वाहनांना थांबावे लागते. ही गोष्ट टाळण्यासाठी प्राधिकरण दुप्पट टोल आकारणार आहे.

गाडीच्या समोरच्या विंडशील्डवर फास्टॅग चिकटवलेले नसल्यास दुप्पट वापरकर्ता शुल्क वसूल करण्यासाठी, एनएचएआयने सर्व वापरकर्ता शुल्क संकलन संस्थांना मानक कार्यप्रणाली (SoP) जारी केली आहे. तसेच, सर्व टोल नाक्यांवर महामार्ग वापरकर्त्यांना, समोरच्या विंडशील्डवर निश्चित फास्टॅगशिवाय टोल लेनमध्ये प्रवेश केल्याबद्दल दंडाबद्दल माहिती दिली जाईल. याशिवाय, विंडशील्डवर व्यवस्थित न लावलेल्या फास्टॅग प्रकरणांची नोंद, त्या गाड्यांच्या वाहन नोंदणी क्रमांक (VRN) सोबत केली जाईल. यामुळे आकारले जाणारे शुल्क आणि टोल लेनमध्ये वाहनाची उपस्थिती याबाबत योग्य रेकॉर्ड ठेवण्यास मदत होईल. (हेही वाचा: Krystal keen On Hiring Agniveers: अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी! लष्कराचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर क्रिस्टल कंपनीत मिळू शकते ताबडतोब नोकरी, जाणून घ्या सविस्तर)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now