Kannauj Accident: लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर डबल डेकर बसची टँकरला धडक; 8 ठार, 19 जखमी (Watch Video)

बस लखनौहून दिल्लीला जात असताना हा अपघात झाला. पोलीस अधीक्षक (एसपी) अमित कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला.

Double-decker bus hits tanker (फोटो सौजन्य -ANI)

Kannauj Accident: उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात शुक्रवारी लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावर ( Lucknow-Agra Expressway) बसने पाण्याच्या टँकरला धडक बसल्याने आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात 19 जण जखमी झाले. बस लखनौहून दिल्लीला जात असताना हा अपघात झाला. पोलीस अधीक्षक (एसपी) अमित कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला. ते म्हणाले, लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर बस आणि पाण्याच्या टँकरच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सैफई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर डबल डेकर बसची टँकरला धडक, पहा व्हिडिओ - 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement