Dhirendra Shastri On Sai Baba: बागेश्वर बाबांचे साई बाबांबाबत वादग्रस्त विधान, म्हणाले- 'कोल्ह्याची कातडी धारण करून कोणी सिंह होऊ शकत नाही'

जबलपूरमध्ये एका कथेदरम्यानच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही.

Self-Styled Godman Dhirendra Shastri Alias Bageshwar Dham Sarkar. (Photo Credits: ANI)

बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक वादग्रस्त वक्त्यव्य केले आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी जबलपूरमध्ये एका कथेदरम्यानच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही. कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे. शास्त्री यांची कथा मध्य प्रदेशातील जबलपूर येथे सुरू होती. यादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, ‘आमच्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवतेचे स्थान दिलेले नाही. शंकराचार्यांनी सांगितलेली गोष्ट पाळणे हा प्रत्येक सनातनीचा धर्म आहे. कारण ते आपल्या धर्माचे प्रमुख आहेत. साई बाबा हे संत असतील पण देव नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)