Delhi Workers Minimum Wages Hike: दिल्लीतील कामगारांच्या किमान वेतनात वाढ; 1 ऑक्टोबरपासून नवे दर लागू, जाणून घ्या आता किती मिळणार पगार
अर्ध-कुशल कामगारांचे मासिक वेतन 286 रुपयांनी वाढून, 18,993 रुपयांवरून 19,279 रुपये झाले आहे.
दिल्ली सरकारने कामगारांच्या किमान वेतनात वाढ केली आहे. नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. नवीन वाढीव दरानुसार, कुशल कामगारांचे वेतन 312 रुपयांनी वाढले आहे. आता त्यांचे मासिक वेतन 20,903 रुपयांवरून 21,215 रुपये झाले आहे. अर्ध-कुशल कामगारांचे मासिक वेतन 286 रुपयांनी वाढून, 18,993 रुपयांवरून 19,279 रुपये झाले आहे. दिल्ली सरकारच्या कामगार मंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा: देशात Mukesh Ambani यांच्याकडे आहे सर्वात जास्त संपत्ती; महाराष्ट्रात राहतात भारतामधील बहुतेक अतिश्रीमंत व्यक्ती, हुरुन रिच लिस्टमधून समोर आली माहिती)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)