Delhi Shocking Video: भर रस्त्यावर तरुणीला मारहाण करत जबरदस्तीने गाडीत ढकलले, व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओसमोर आल्यानंतर नेटिझन्सनी राजधानी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

दिल्लीच्या मंगोलपुरी (Delhi Mangolpuri) भागात एका व्यक्तीने एका तरुणीला मारहाण करत तिला कॅबमध्ये जबरदस्तीने बसवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral) होत आहे. हा व्हिडिओसमोर आल्यानंतर नेटिझन्सनी राजधानी दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली आऊटर डिस्ट्रीक डीसीपी यांनी या व्हिडिओची दखल घेतली आणि तपास सुरू केला असल्याचे म्हटले. "काल रात्रीपासून व्हिडिओची चौकशी सुरू आहे. कॅबचा मालक गुरुग्राममध्ये राहतो आणि पोलिसांचे पथक त्याची चौकशी करणार आहे.” अशी माहिती ही त्यांनी दिली.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now