Delhi: दिल्लीच्या ऐतिहासिक राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून होणार 'कर्तव्य पथ'

आता नेताजींच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा रस्ता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाईल.

Rajpath (संग्रहित संपादित प्रतिमा)

एक मोठे पाऊल उचलत मोदी सरकारने राजधानी दिल्लीमधील राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून ‘कर्तव्य पथ’ करण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. वसाहतवादी मानसिकता संपवण्याच्या नवी दिल्लीच्या प्रयत्नातील ताजे पाऊल म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे. आता नेताजींच्या पुतळ्यापासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा रस्ता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाईल. सूत्रांनी सांगितले की, एनडीएमसीने राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टाच्या लॉनचे कर्तव्य पथ म्हणून नामकरण करण्यासाठी 7 सप्टेंबर रोजी विशेष बैठक बोलावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now