Dehradun Car Accident: डेहराडूनमध्ये भीषण रस्ता अपघात; इनोव्हा आणि ट्रकच्या धडकेत 6 तरुणांचा मृत्यू, 1 जखमी (Video)

एक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत व जखमी हे सर्व खासगी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Accident (PC- File Photo)

Dehradun Car Accident: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. ओएनजीसी चौकात उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव येणा-या इनोव्हा कारने धडक दिली. या अपघातात तीन विद्यार्थिनींसह सहा जणांचा मृत्यू झाला. एक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृत व जखमी हे सर्व खासगी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, कारचा पूर्ण चक्काचूर झाला. कसेबसे गाडीच्या काचा कापून मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यात आले. कंटेनरला धडकलेल्या इनोव्हा कारमध्ये 7 जण होते. यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असून 1 रूग्णालयात दाखल आहे. या अपघाताचा एक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. इनोव्हा आणि कंटेनरच्या धडकेमागे नेमके कारण काय होते आणि त्यात काही निष्काळजीपणा होता का, याचा प्रथम शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. (हेही वाचा: Pilibhit Bus Accident: यूपीच्या पिलीभीतमध्ये रस्ता अपघात, मजुरांना घेऊन जाणारी बस उलटली, 25 जखमी)

डेहराडूनमध्ये भीषण रस्ता अपघात-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)