Cyclone Biparjoy: सुरु झाली बिपरजॉय चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया, मध्यरात्रीपर्यंत चालणार- IMD
जेव्हा चक्रीवादळ जोरदार वाऱ्यासह समुद्रात तसेच जमिनीवर प्रवेश करते, तेव्हा त्या स्थितीला लँडफॉल म्हणतात. या दरम्यान जोरदार वारे, मुसळधार पाऊस, समुद्राची पातळी वाढते.
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनार्याकडे सरकत असून, त्याने अतिशय धोकादायक रूप धारण केले आहे. कच्छच्या जखाऊ येथे आज आठच्या दरम्यान ते जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान खात्याने बिपरजॉयबद्दल चेतावणी जारी करताना म्हटले होते की, अत्यंत तीव्र चक्रीवादळ हे साडेचार वाजता जाखाऊ बंदर (गुजरात) पासून सुमारे 80 किमी दक्षिण-पश्चिमेस आणि देवभूमी द्वारकेच्या दक्षिणेस 130 किमी अंतरावर आहे. जखाऊ बंदराजवळ आज संध्याकाळपासून या चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया सुरू होईल आणि ती मध्यरात्रीपर्यंत सुरू राहील.
जेव्हा चक्रीवादळ जोरदार वाऱ्यासह समुद्रात तसेच जमिनीवर प्रवेश करते, तेव्हा त्या स्थितीला लँडफॉल म्हणतात. या दरम्यान जोरदार वारे, मुसळधार पाऊस, समुद्राची पातळी वाढते. चक्रीवादळ जमिनीवर येण्याच्या काही तास आधी त्याचा प्रभाव दाखवू लागतो, त्यामुळे प्रभावित भागात पाऊस आणि वादळाचा सामना करावा लागतो. (हेही वाचा: 'बिपरजॉय' चक्रीवादळ आज गुजरातला धडकणार; तिन्ही सेना दल पूर्णपणे सज्ज, 76 गाड्या रद्द)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)