Cultfit Layoff: झोमॅटो समर्थित Cure Fit Healthcare मध्ये नोकर कपात; 120-150 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा

वित्तीय वर्ष 25 मध्ये कंपनी-स्तरीय नफा साध्य करण्याच्या उद्देशाने, व्यवसाय पुनर्रचना आणि ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्याचा भाग म्हणून कंपनीने 120-150 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

Cultfit Layoff: झोमॅटो समर्थित क्युअर फिट हेल्थकेअरने व्यवसायाची पुनर्रचना आणि कामकाज सुव्यवस्थित करण्याचा भाग म्हणून 120-150 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. क्युअर फिट हेल्थकेअर ही फिटनेस सेंटर ऑपरेटर कल्ट फिटची मूळ कंपनी आहे. वित्तीय वर्ष 25 मध्ये कंपनी-स्तरीय नफा साध्य करण्याच्या उद्देशाने, व्यवसाय पुनर्रचना आणि ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्याचा भाग म्हणून कंपनीने 120-150 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे, 'आमच्या नियमित वार्षिक संचालन नियोजन प्रक्रियेचा भाग म्हणून, आम्ही ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने काही अनावश्यक पदे कमी केली आहेत. याचा उद्देश उत्पादकता सुधारणे आणि आम्हाला आर्थिक वर्ष 2025 मध्ये पूर्ण नफा मिळवून देणे हे आहे.' (हेही वाचा: AI to Hit Jobs: एआयमुळे जगभरातील 40% नोकऱ्या येऊ शकतात धोक्यात; IMF ने दिला इशारा, श्रीमंत देशांना जास्त धोका)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)