Couple's Lipstick Drama Goes Viral! पतीने 10 रुपयांच्याऐवजी 30 रुपयांची लिपस्टिक आणली म्हणून पत्नी गेली माहेरी; पोलिसांत तक्रार दाखल, घटस्फोटांपर्यंत पोहोचले प्रकरण
हा तरुण एका खासगी कंपनीत काम करतो. एके दिवशी पत्नीने त्याला लिपस्टिक आणण्यास सांगितले. मात्र नवऱ्याने 30 रुपयांची लिपस्टिक आणताच भांडण सुरू झाले.
Agra Couple's Lipstick Drama: उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात घटस्फोटाचे एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. इथे पतीला आपल्या पत्नीसाठी 10 रुपयांऐवजी 30 रुपयांची लिपस्टिक विकत घेणे फार महागात पडले आहे. 30 रुपयांच्या लिपस्टिकवरून पती-पत्नीमधील वाद इतका वाढला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. पतीने 30 रुपये किमतीची लिपस्टिक आणल्याने पत्नी इतकी संतापली की ती, सासर सोडून आपल्या आई-वडिलांच्या घरी गेली. पतीने 10 रुपयांची लिपस्टिक आणावी अशी पत्नीची इच्छा होती. पण पतीने महागडी लिपस्टिक आणल्यावर पत्नीला राग आला. त्यानंतर तिने पतीविरोधात पोलिसांत तक्रारही केली. पोलिसांनी हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे वर्ग केले आहे.
हा तरुण एका खासगी कंपनीत काम करतो. एके दिवशी पत्नीने त्याला लिपस्टिक आणण्यास सांगितले. मात्र नवऱ्याने 30 रुपयांची लिपस्टिक आणताच भांडण सुरू झाले. पत्नीची अपेक्षा होती की तो 30 रुपयांपेक्षा स्वस्त असलेली लिपस्टिक घेऊन येईल. पत्नीचा आरोप आहे की तिचा पती खूप खर्च करत राहतो आणि भविष्यासाठी काहीही ठेवत नाही. (हेही वाचा: Ghaziabad: महिलांना ऑटोमध्ये बसवून लुट, पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपींना केली अटक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)