Gujarat: देशात उष्णतेची लाट, उन्हाची झळ प्राण्यांनाही, अहमदाबादमध्ये प्राण्यांसाठी लागले कुलर्स
प्राणिसंग्रहालयात प्राण्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी कुलर आणि स्प्रिंकलर लावण्यात आले आहेत,
देशाच्या विविध भागात उन्हाने आपला प्रकोप दाखवला असून, कडक उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या कडाक्याच्या उन्हामुळे माणसेच नव्हे तर जनावरांचेही हाल होत आहेत. अशा परिस्थितीत गुजरातमधील अहमदाबाद येथील प्राणीसंग्रहालयात प्राण्यांना उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी स्तुत्य प्रयत्न करण्यात आला आहे. या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी कुलर आणि स्प्रिंकलर लावण्यात आले आहेत, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)