दिवसा मद्यपान करणे गुन्हा नाही; मद्रास हायकोर्टाची टिप्पणी, राज्य सरकारला दिले 'हे' निर्देश

न्यायालयाने सांगितले की, दिवसा मद्यपान करणे हा गुन्हा नाही आणि मोटार अपघातात सहभागी व्यक्तीला त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही.

Madras High Court (PC- wikimedia Commons)

Consuming Alcohol During Day Not Offence: मद्रास हायकोर्टाने नुकतेच मद्यपानाबाबत एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने सांगितले की, दिवसा मद्यपान करणे हा गुन्हा नाही आणि मोटार अपघातात सहभागी व्यक्तीला त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही. 16 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात, न्यायमूर्ती एन आनंद व्यंकटेश यांनी 2016 मध्ये रस्ता अपघातात गुंतलेल्या तामिळनाडूमधील पेरांबलूर जिल्ह्यातील रहिवाशाला दिलेली भरपाई वाढवली. मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला सर्व रुग्णालयांना अपघातातील मृत/जखमींच्या रक्तातील अल्कोहोल पातळीचे मूल्यांकन करण्यास सांगण्याचे निर्देश दिले आहेत. रांबलूर येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (एमएसीटी) सध्याच्या खटल्यातील याचिकाकर्त्या रमेशला 3 लाखांहून अधिक नुकसान भरपाई दिली होती. मात्र अपघातानंतर लगेचच रमेशची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी ‘त्याच्या श्वासात दारूचा वास येत असल्याचे’ त्यांच्या अहवालात म्हटले होते, या कारणास्तव नुकसानभरपाईच्या रकमेतील 50 टक्के रक्कम कपात केली होती. न्यायमूर्ती व्यंकटेश यांनी मात्र असा तर्क संशयास्पद असल्याचे मत व्यक्त केले. (हेही वाचा: Airbag Case: एअरबॅग्स उघडल्या नाहीत तर, कार कंपनी ठरणार दोषी? सीट बेल्टकडे दुर्लक्ष करणे चालकाला पडले महागात, NCDRC ने दिला महत्त्वाचा निर्णय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now