दिवसा मद्यपान करणे गुन्हा नाही; मद्रास हायकोर्टाची टिप्पणी, राज्य सरकारला दिले 'हे' निर्देश
न्यायालयाने सांगितले की, दिवसा मद्यपान करणे हा गुन्हा नाही आणि मोटार अपघातात सहभागी व्यक्तीला त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही.
Consuming Alcohol During Day Not Offence: मद्रास हायकोर्टाने नुकतेच मद्यपानाबाबत एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने सांगितले की, दिवसा मद्यपान करणे हा गुन्हा नाही आणि मोटार अपघातात सहभागी व्यक्तीला त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजल्याशिवाय दोषी ठरवता येणार नाही. 16 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात, न्यायमूर्ती एन आनंद व्यंकटेश यांनी 2016 मध्ये रस्ता अपघातात गुंतलेल्या तामिळनाडूमधील पेरांबलूर जिल्ह्यातील रहिवाशाला दिलेली भरपाई वाढवली. मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला सर्व रुग्णालयांना अपघातातील मृत/जखमींच्या रक्तातील अल्कोहोल पातळीचे मूल्यांकन करण्यास सांगण्याचे निर्देश दिले आहेत. रांबलूर येथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (एमएसीटी) सध्याच्या खटल्यातील याचिकाकर्त्या रमेशला 3 लाखांहून अधिक नुकसान भरपाई दिली होती. मात्र अपघातानंतर लगेचच रमेशची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी ‘त्याच्या श्वासात दारूचा वास येत असल्याचे’ त्यांच्या अहवालात म्हटले होते, या कारणास्तव नुकसानभरपाईच्या रकमेतील 50 टक्के रक्कम कपात केली होती. न्यायमूर्ती व्यंकटेश यांनी मात्र असा तर्क संशयास्पद असल्याचे मत व्यक्त केले. (हेही वाचा: Airbag Case: एअरबॅग्स उघडल्या नाहीत तर, कार कंपनी ठरणार दोषी? सीट बेल्टकडे दुर्लक्ष करणे चालकाला पडले महागात, NCDRC ने दिला महत्त्वाचा निर्णय)
Consuming alcohol during day not offence: Madras High Court sets aside contributory negligence deduction in MACT award
report by @ayeshaarvind https://t.co/K64ah4mO66
— Bar and Bench (@barandbench) April 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2024 11:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

