Congress to Stage Nationwide Protest: आयकर विभागाच्या नोटिशीवर काँग्रेस पक्ष करणार देशव्यापी आंदोलन; KC Venugopal यांनी सर्व राज्य घटकांना दिले निर्देश
ते म्हणाले की, आयकर विभाग आठ वर्षे जुन्या आयकर विवरणपत्रांच्या आधारे दंड आकारत आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे.
Congress to Stage Nationwide Protest: काँग्रेस पक्षाला प्राप्त झालेल्या आयकर नोटिसीच्या विरोधात पक्ष देशव्यापी निदर्शने करणार आहे. शुक्रवारी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सर्व राज्य घटकांना या मुद्द्यावर शनिवारी सर्व राज्य आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात निदर्शने करण्याचे निर्देश दिले आहेत. केसी वेणुगोपाल यांनी एक पत्र जारी केले आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला आता एक महिना झाला आहे, आयकर विभागाने गुरुवारी 1823.08 कोटी रुपयांची नोटीस पाठवली, जी स्वीकारार्ह नाही.
वेणुगोपाल यांनी पत्रात असेही म्हटले आहे की, यापूर्वी प्राप्तिकर विभागाने काँग्रेस पक्षाच्या खात्यातून 125 कोटी रुपये जबरदस्तीने काढले होते. ते म्हणाले की, आयकर विभाग आठ वर्षे जुन्या आयकर विवरणपत्रांच्या आधारे दंड आकारत आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: कंगना राणौतचा मंडीत रोड शो, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात काम करताना कोणतीही कसर न सोडण्याचे जनतेला आश्वासन)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)