Class 11 Girl Delivers Baby In College Toilet: कर्नाटकात अकरावीत शिकणाऱ्या मुलीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

मुलगी गरोदर होती, पण कुटुंबाला गर्भधारणेची माहिती कशी मिळाली नाही आणि त्यांनी ही माहिती का लपवली हे अद्यापही गूढच आहे.

Baby (File Image)

Class 11 Girl Delivers Baby In College Toilet: कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे खासगी प्री-विद्यापीठ महाविद्यालयात शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीने सोमवारी शाळेच्या आवारातच एका मुलाला जन्म दिला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इयत्ता 11वीत शिकणाऱ्या मुलीने महिलांच्या शौचालयात मुलाला जन्म दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आणि बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर मुलीच्या पालकांनी कोलार महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी आणि मुलगा गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मुलगी गरोदर होती, पण कुटुंबाला गर्भधारणेची माहिती कशी मिळाली नाही आणि त्यांनी ही माहिती का लपवली हे अद्यापही गूढच आहे. या प्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: BNS-Sexual Offence Laws: भारतीय न्याय संहितेमध्ये लैंगिक गुन्ह्यांसाठी लिंग-तटस्थ तरतुदींचा समावेश; काय बदलले? घ्या जाणून)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif