Diwali Celebration Turns Tragic in UP: दिवळी साजरी करणाऱ्या नागरिकांना भरधाव कारने उडवले, नोएडा येथील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

दिवाळी उत्साहात साजरी करणाऱ्या लोकांवर एका क्षणात दुख:चा डोंगर कोसळल्याची धक्कादायक घटना दिल्ली नोएडा येथे घडली आहे. नोएडा येथे सोसायटीबाहेर दिवाळी साजरी करत असणाऱ्या लोकांना भरधाव वेगाने आलेल्या एका कारने धडक दिली.

दिवाळी उत्साहात साजरी करणाऱ्या लोकांवर एका क्षणात दुख:चा डोंगर कोसळल्याची धक्कादायक घटना दिल्ली नोएडा येथे घडली आहे. नोएडा येथे सोसायटीबाहेर दिवाळी साजरी करत असणाऱ्या लोकांना भरधाव वेगाने आलेल्या एका कारने धडक दिली. ज्यामध्ये काही लोक जखमी झाले. घटना घडल्यानंतर चालकाने घटनास्थळावरुन कारसह पळ काढला. ही घटना नोएडाच्या सेक्टर 119 मधील इलडेको अमंत्रन सोसायटीमध्ये रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी दीपावलीच्या उत्सवादरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अवघ्या 45 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक स्विफ्ट कार कथितपणे रॅव्हलरमध्ये घुसताना दिसत आहे. जे नोएडामधील सोसायटीच्या बाहेर फटाके फोडत आहेत. व्हिडिओ जसजसा पुढे सरकतो तसतसे वाहन एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या बोनेटवर किमान 400 मीटरपर्यंत ओढून नेताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement