Cigarettes Costlier Funny Memes: सिगारेट प्रेमींना निर्मला सितारामन यांच्याकडून महागाईचा चटका; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
त्यामुळे सिगारेट प्रेमींकडून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. काही उत्साहींनी तर चक्क मिम्सच (Cigarettes Costlier Funny Memes) शेअर केले. यातील काही मिम्स खाली देत आहोत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आर्थिक वर्ष 2023/24 (Budget 2023-24) साठी अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. अर्थसंकल्पात त्यांनी काही वस्तू स्वस्त तर काही भलत्याच महाग झाल्याचे स्पष्ट केले. स्वस्त वस्तुंमध्ये प्रामुख्याने एलईडी टीव्ही, कपडे, मोबाईल फोन, खेळणी, मोबाईल कॅमेरा लेन्स, इलेक्ट्रीक वाहने, बायोगॅसशीसंबंधीत वस्तू, लिथियम सेल्स, सायकल यांचा समावेश आहे. तर महाग वस्तूंमध्ये सिगारेट, मद्य, छत्री, विदेशी किचन चिमनी, सोने, आयात केलेले चांदिचे सामान, प्लेटिनम, एक्स-रे मशीन, हिरे आदी वस्तूंचा समावेश आहे. दरम्यान, या दरवाढीचा चटका सिगारेटप्रेमींना काहीसा अधिकच लागला. त्यामुळे सिगारेट प्रेमींकडून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. काही उत्साहींनी तर चक्क मिम्सच (Cigarettes Costlier Funny Memes) शेअर केले. यातील काही मिम्स खाली देत आहोत.
ट्विट
ट्विट
ट्विट
ट्विट
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)