Chhattisgarh Horror: अनाथआश्रमात महिला केअरटेकरची लहान मुलांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल (Watch Shocking Video)
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. व्यवस्थापकाचे नाव सीमा द्विवेदी आहे. यापूर्वीही तिच्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिवनगर येथे असलेल्या अनाथाश्रमातील मुलांवर अतिशय भयानक पद्धतीने अत्याचार केले जात आहेत. याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये केंद्रातील महिला कार्यक्रम व्यवस्थापक लहान मुलांना निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे. ही महिला एका लहान मुलाला मारते. त्याचा केसांना ओढून जमिनीवर पाडते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. व्यवस्थापकाचे नाव सीमा द्विवेदी आहे. यापूर्वीही तिच्याविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या घटनेनंतर कांकेर जिल्हा प्रशासनाने दोषी कार्यक्रम व्यवस्थापकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरोपी महिलेला कधीही अटक होऊ शकते. साधारण 6 वर्षांखालील मुले या दत्तक केंद्रात राहतात.
(हेही वाचा: Woman Beating Man Video: महिलेने पुरुषाला बसमध्ये बदडले, बसमध्ये छेडछाड केल्याचा आरोप; व्हिडिओ व्हायरल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)