Chandra Shekhar Aazad Shot in UP: सहारनपूरमध्ये चंद्रशेखर आझाद यांच्यावर प्राणघातक हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या, थोडक्यात बचावले भीम आर्मी प्रमुख (Video)

माहितीनुसार हेल्लेखोरांच्या गाडीचा क्रमांक हरियाणाचा होता. ही घटना घडली तेव्हा आझाद यांच्या गाडीत एकूण पाच जण होते.

Bhim Army chief Chandrashekhar Azad (Photo Credits: Facebook)

सहारनपूर जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी दलित नेते आणि आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हल्ला केला. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. चंद्रशेखर आझाद सुरक्षित असल्याचे जिल्ह्याचे एसएसपी विपिन तांडा यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘सुमारे अर्ध्या तासापूर्वी हल्लेखोरांनी चंद्रशेखर यांच्या ताफ्यावर गोळीबार केला. त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.’ सध्या जखमी चंद्रशेखर आझाद यांचा रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. माहितीनुसार हेल्लेखोरांच्या गाडीचा क्रमांक हरियाणाचा होता. ही घटना घडली तेव्हा आझाद यांच्या गाडीत एकूण पाच जण होते. (हेही वाचा: Karnataka Shocker: पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून व्यक्तीने मित्राचा चिरला गळा, प्यायले रक्त; कर्नाटकातील भीषण घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now