Cash For Query Case: खासदार Mahua Moitra यांच्यावरील नीतिशास्त्र समितीचा अहवाल उद्या लोकसभेत होणार सादर
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा मोईत्रा यांच्यावर आरोप आहे.
TMC खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील नीतिशास्त्र समितीचा अहवाल उद्या (8 डिसेंबर) लोकसभेत मांडला जाणार आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा मोईत्रा यांच्यावर आरोप आहे. याआधी हा अहवाल 4 डिसेंबर रोजी लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या सभागृहाच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट करण्यात आला होता. महुआ मोईत्रा यांची हकालपट्टी करण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वी समितीच्या शिफारशींवर सभागृहात सविस्तर चर्चा व्हायला हवी, अशी विरोधकांची मागणी होती.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)