Brother Kills Sister: क्षुल्लक कारणावरून 14 वर्षांच्या मुलाने केली आपल्या 7 वर्षाच्या बहिणीची हत्या; Baghpat मधील धक्कादायक घटना

मुलीचा शोध न लागल्याने पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांचे पथक सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मुलीचा शोध घेत होते. त्यावेळी एका व्हिडिओमध्ये हा मुलगा बराच वेळ रस्त्यावर भटकताना दिसला.

Death | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Brother Kills Sister: उत्तर प्रदेशच्या बागपतमधून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी एका 14 वर्षांच्या मुलाने आपल्या सात वर्षांच्या बहिणीचा गळा दाबून खून केला. या मुलीने अनेकदा तिच्या आई-वडिलांकडे भावाची खोटी तक्रार केली होती, याच रागातून भावाने बहिणीची हत्या केली व नंतर तिचा मृतदेह फेकून दिला. अहवालानुसार आरोपी आपल्या बहिणीला घेऊन बाहेर घेऊन गेला. यावेळी त्याने हिजाबने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर तो मशिदीत शिकायला गेला. जेव्हा कुटुंबीयांनी बहिणीबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती मशिदीतून आधीच घरी परतली होती.

मुलीचा शोध न लागल्याने पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांचे पथक सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मुलीचा शोध घेत होते. त्यावेळी एका व्हिडिओमध्ये हा मुलगा बराच वेळ रस्त्यावर भटकताना दिसला. पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याची कसोशीने चौकशी सुरू केली, तेव्हा त्याने संपूर्ण सत्य उघड केले. आरोपीने सांगितले की, बहिण सतत त्याची खोटी तक्रार करायची व त्यामुळे भावाला मारहाण केली जायची. त्यानंतर भावाने बहिणीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा: Murder Video: लग्नास नकार दिल्याने महिलेची भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या; मोहालीतील धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now