Gujarat BJP Leader Killed: भाजपा पदाधिकारी शैलेश पटेल मंदिराबाहेर पत्नीची वाट पाहत असताना अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात मृत्यूमुखी

शैलेश पटेल यांच्या पत्नीने मारेकर्‍यांचा चेहरा पाहिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यावरून आता पुढील तपास करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Gujarat BJP Leader Killed: भाजपा पदाधिकारी शैलेश पटेल मंदिराबाहेर पत्नीची वाट पाहत असताना अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात मृत्यूमुखी
Gun Shot | Pixabay.com

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती भाजपचे वापी तालुक्याचे उपाध्यक्ष शैलेश पटेल  होते. त्यांची हत्या रता गावात सकाळी 7 च्या सुमारास गोळ्या झाडून करण्यात आली. ते मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. पटेल हे ड्रायव्हरच्या सीटवर असताना अचानक मोटारसायकलवरील दोन व्यक्ती कारजवळ आल्या आणि त्यांनी त्यांच्यावर  अगदी जवळच्या अंंतरावरून 2-3 गोळ्या झाडल्या आणि तेथून  पळ काढला.  Mankhurd Murder Case: मुंबईच्या मानखुर्द भागात 22 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला रक्ताच्या थारोळ्यात; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement