IPL Auction 2025 Live

BJP MLA Demands Holiday On Opening Day of Ram Mandir: भारत सरकारने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी; भाजप आमदार Raj K Purohit यांची मागणी

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुंबईतील भाजपचे माजी मंत्री राज के पुरोहित यांनी केली आहे.

Ram Mandir (PC - ANI/Twitter)

अयोध्येत उभारले जाणारे राम मंदिर भव्य आणि खास बनवण्याची तयारी जोरात सुरू आहे. मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा समारंभ आणि अभिषेक सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. आता अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुंबईतील भाजपचे माजी मंत्री राज के पुरोहित यांनी केली आहे. याबाबत पुरोहित म्हणतात, ‘22 जानेवारी 2024 हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा ऐतिहासिक संस्मरणीय दिवस आहे. भगवान श्रीरामाच्या लाखो राम भक्तांच्या 500 वर्षांची तपश्चर्या, त्याग आणि बलिदानानंतर जन्मभूमी अयोध्येतील भव्य श्री राम मंदिराचा अभिषेक आदरणीय जगप्रसिद्ध पंतप्रधानांच्या शुभ हस्ते होणार आहे.’

ते पुढे म्हणतात, ‘हे 140 कोटी देशवासीयांचे सौभाग्य आहे, त्यांना 22 जानेवारी 2024 चा शुभ दिवस पाहण्याची संधी मिळणार आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील कोट्यवधी भाविक या शुभ उत्सवात आनंदाने सामील होणार आहेत. त्यामुळे या शुभ सणाचे महत्त्व लक्षात घेऊन माझी नम्र विनंती आहे की, या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी 22 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करा, जेणेकरून कोटय़वधी देशवासीय आपापल्या परीने या उत्सवात सहभागी होऊ शकतील.’ (हेही वाचा: Punjab Shocker: अमृतसर येथील सुर्वण मंदिरातून 1लाख रुपयांची चोरी, चार जणांविरुध्दात गुन्हा दाखल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)