Bihar Shocker: बिहारच्या रुग्णालयातील दुर्दशा; युरीनल बॅग उपलब्ध नसल्याने रुग्णासाठी वापरली कोल्डड्रिंकची बाटली (Watch Video)

मात्र ही सर्व औषधे इमर्जन्सी स्टॉकमध्ये आढळून आली नाहीत. त्यानंतर युरीनल बॅगही उपलब्ध नसल्याने कोल्डड्रिंकच्या बाटलीचा वापर करण्यात आला.

Bihar Shocker

बिहारच्या जमुई येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सदर रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डात दाखल असलेल्या रुग्णाला आरोग्य कर्मचाऱ्यांनी युरीनल बॅगच्या ऐवजी कोल्ड ड्रिंकची बाटली लावली. माहितीनुसार, सोमवारी (7 ऑगस्ट) रात्री उशिरा झाझाचे रेल्वे पोलीस एका प्रवाशाला बेशुद्ध अवस्थेत घेऊन सदर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रुग्णाला येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरू करण्यासाठी डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांना या रुग्णाला युरीनल बॅग लावून काही इंजेक्शन्स देण्याच्या देण्याच्या सूचना दिल्या. मात्र ही सर्व औषधे इमर्जन्सी स्टॉकमध्ये आढळून आली नाहीत. त्यानंतर युरीनल बॅगही उपलब्ध नसल्याने कोल्डड्रिंकच्या बाटलीचा वापर करण्यात आला. रुग्णालय व्यवस्थापकांना याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी (8 ऑगस्ट) पहाटे युरीनल बॅग व इतर आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात आला. (हेही वाचा: Officials Work Wearing Helmets: तेलंगणातील सरकारी कर्मचाऱ्यांवर हेल्मेट घालून काम करण्याची वेळ; व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या कारण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)