Bhubaneswar-Howrah Jan Shatabdi Express: भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेसला कटक स्थानकावर, धोका टळला, कोणतीही जीवित हानी नाही (Watch Video)

त्यांनी संबंधित विभागांना कल्पना देताच काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान सेवेत दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली.

भुवनेश्वर-हावडा जनशताब्दी एक्स्प्रेस (12074) मध्ये आज (गुरुवार, 7 डिसेंबर) सकाळी कटक स्थानकावर आग लागली. ही ट्रेन भुवनेश्वरहून पश्चिम बंगालच्या हावडा येथे जात असताना डब्याखाली आग लागल्याचे काही प्रवाशांना दिसले. त्यांनी संबंधित विभागांना कल्पना देताच काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान सेवेत दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाल्याची कोणतेही वृत्त नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कटक स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबताना ब्रेक बाइंडिंगमध्ये झालेल्या समस्येमुळे ही आग लागली. सुदैवाने, ट्रेन स्थानकावर थांबली असताना आग भडकली, त्यामुळे अग्निशमन दल आणि आरपीएफच्या जवानांनी तात्काळ आपत्कालीन परिस्थिती हाताळून ती आटोक्यात आणली. रेल्वे अभियंते आणि अग्निसुरक्षा पथकाकडून कसून तपासणी आणि परवानगी घेतल्यानंतर ट्रेनने कटक स्थानकाहून आपल्या गंतव्यस्थानासाठी सोडले. (हेही वाचा, Fire In Local Train: गुजरातमधील बोताड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनला आग; Watch Video)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)