Balasore Train Accident: बालासोर ट्रेन दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने मोठी कारवाई; दक्षिण पूर्व रेल्वेच्या महाव्यवस्थापक अर्चना जोशी यांना पदावरून हटवले

बालासोर जिल्ह्यात तीन गाड्या एकमेकांना धडकून झालेल्या भीषण अपघातात मृतांची संख्या 293 वर पोहोचली आहे.

Balasore Train Accident (PC - ANI/Twitter)

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या तिहेरी रेल्वे अपघाताची चौकशी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयोगाने (CRS) आपला अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. मात्र, अहवालाच्या निष्कर्षाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अहवालातील निष्कर्षांवर भाष्य करण्यास नकार दिला. बालासोर जिल्ह्यात तीन गाड्या एकमेकांना धडकून झालेल्या भीषण अपघातात मृतांची संख्या 293 वर पोहोचली आहे. प्राथमिक तपासणीत रेल्वे अपघाताचे संभाव्य कारण हे सिग्नलमध्ये निष्काळजीपणा किंवा हेतुपुरस्सर हस्तक्षेप असल्याचे सुचवले आहे.

बालासोर ट्रेन दुर्घटनेवर रेल्वे मंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे. दक्षिण पूर्व रेल्वेच्या जीएम अर्चना जोशी यांना पदावरून हटवण्यात आले आहे. मंत्रालयाने अर्चना जोशी यांच्या जागी अनिल मिश्रा यांची नवीन महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे. याआधीही रेल्वे बोर्डाने 5 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. ऑपरेशन, सुरक्षा आणि सिग्नलशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. (हेही वाचा: MP Shocker: काय सांगता? न्यायालयाने आरोपीला सुनावली 170 वर्षांची शिक्षा; सागर जिल्ह्यातील अनोखे प्रकरण, जाणून घ्या काय होता गुन्हा)