Odisha Train Accident: ओडिशातील अपघाताच्या 51 तासानंतर रेल्वेसेवा पुर्ववत, रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात
ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत.
ओडिशामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. कोरोमंडल एक्स्प्रेसचा बहानगा स्टेशनवर थांबा नसल्याने ही रेल्वे पूर्ण वेगाने धावत होती. परंतु बहानगा स्टेशनजवळून ज्या लूप लाईनवरून कोरोमंडल एक्स्प्रेस जाणार होती, तिथे आधीपासूनच एक मालगाडी उभी होती. त्यामुळेच अपघात झाला. या अपघाताच्या 51 तासाच्या बचाव कार्याच्या नंतर आता दोन्ही ट्रॅक पूर्ववत करण्यात आले असून आतापासून रेल्वे वाहतूक सुरू होणार असल्याचे रेल्वे मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी सांगितले. त्याचवेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले असून ट्रॅक सुरू होताच रेल्वेमंत्र्यांनी हात जोडले... त्यांनी घटनास्थळी तैनात कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)