Assam Shocker: सिलचरमध्ये आईने आपल्या 20 महिन्यांच्या बाळाला दारू पाजली, सिगारेट ओढण्यास भाग पाडले; तपास सुरु (See Photo)

याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून आईला ताब्यात घेतले.

Mother Forces Her Child To Smoke Cigarette, Drink Alcohol

Mother Forces Her Child To Smoke Cigarette, Drink Alcohol: आसाममधील सिलचरमध्ये आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका महिलेने आपल्या 20 महिन्यांच्या बाळाला  सिगारेट ओढण्यास आणि दारू पिण्यास भाग पाडल्याचे आढळून आले आहे. वृत्तानुसार, बुधवारी रात्री सिलचरच्या चेंगकुरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. अहवालात असे सूचित होते की, स्थानिक चाइल्ड हेल्पलाइन सेलला त्या महिलेबद्दल तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर एक फोरो समोर आला ज्यांनी कथित दाव्यांना समर्थन दिले. तक्रारीनंतर लगेचच पोलीस महिलेच्या घरी पोहोचले, मुलाची सुटका केली आणि आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

माध्यमांना दिलेल्या निवेदनात, चाइल्ड हेल्पलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी रात्री सिलचरच्या चेंगकुरी येथे एका आईने बाळाला धुम्रपान करण्यास भाग पाडले आणि दारू पाजली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून आईला ताब्यात घेतले आणि बाळाची सुटका केली. सध्या आई आणि मूल हे बालकल्याण समिती (CWC) च्या ताब्यात आहेत. याबाबत सखोल तपास केल्यानंतर, दृष्य पुरावे तपासल्यानंतर आणि आईची चौकशी केल्यानंतर, योग्य ती पावले उचलली जातील. (हेही वाचा: Dead Snake Served In Meal At Govt College: इंजिनीअरिंग कॉलेजच्या कॅन्टीनच्या जेवणात सापडला मृत साप; अनेक विद्यार्थी पडले आजारी)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)